दर्शन पार्क सोसायटीतील अंतर्गत रस्ता पुर्ण

0

औंध :

विधाते वस्ती जवळील दर्शन पार्क सोसायटीतील अंतर्गत रस्त्याचे काम पुर्ण होवून त्याचा लोकार्पण सोहळा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे सोसायटीमध्ये नागरीक हैराण होते. खूप दिवसापासून दुर्लक्षित असलेला हा अंतर्गत रस्ता चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे भाव होते.

या वेळी विशाल विधाते यांनी प्रास्तविक मध्ये सांगीतले की, कार्यक्षम नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पाठपुरावा करत अधिकाऱ्यांना सूचना देवुन रस्ता पुर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलला. रस्त्याचं काम करत असताना अनेक मानव निर्मित व निसर्ग निर्मित अडचणी आल्या त्या नागरिकांच्या सहकार्यामुळे दूर झाल्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. कामाला उशीर झाल्याने नागरीकांना त्रास झाला पण सगळ्यांनी सहकार्य केल्याने काम पुर्ण करण्यास मदत झाली.

बाबुराव चांदेरे यांनी सांगीतले की, विशाल विधाते यांनी  मेहनत घेवुन या रस्त्याचे काम पुर्ण करुन घेतले. ऐक रुपयाचे देखिल बजेट या रस्त्यासाठी नव्हते. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली. दोन्हीं नगरसेवकांनी देखिल बजेट देण्याची तयारी दर्शविली होती सहकार्य केले. पाण्याचा प्रश्न सुटला आहे पण अडचण आली तर लोखंडी लाईन टाकून पाणी पुरवले जाईल. ज्या ज्या अधिकारी कामगार वर्गाने रस्त्याचं काम करण्यास सहकार्य केले त्यांचे आभार मानले.

यावेळी स्थानिक नागरीक मनसे शाखा अध्यक्ष / मंडळ अध्यक्ष अनील वटकर यांनी नगरसेवक चांदेरे यांचे आभार मानले, त्यांनी तत्परतेने नागरिकांची गैरसोय दूर केली. दुर्लक्षित असलेला रस्त्याचे काम पुर्ण केले.

यावेळी अर्जून शिंदे, विशाल विधाते, नितिन कळमकर मनोज बालवडकर, समीर चांदेरे, प्रणव कळमकर, जंगल रणवरे, ओंकार रणपिसे, सुशील मुरकुटे, प्रदीप मुरकुटे, संतोष विधाते, जितेंद्र विधाते, कणसे, अनिल वटकर,सुशील लोणकर, सुषमा ताम्हाणे, पुनम विधाते, प्राजक्ता ताम्हाणे तसेच दर्शन पार्क सोसायटीतील नागरीक व युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

See also  पूरग्रस्तांसाठी चा अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपुर्द करण्यात आला : डॉ. दिलीप मुरकुटे.