पूरग्रस्तांसाठी चा अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपुर्द करण्यात आला : डॉ. दिलीप मुरकुटे.

0

मुंबई :

पश्चिम महाराष्ट्रात व कोकण मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे असंख्य कुटुंब या पूरस्थितीमुळे बाधित झाली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आधार देण्याचे काम सुरू केले आहे. अशा या बिकट परिस्थितीमध्ये स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक देखील सामान्य नागरिकांना मदतीसाठी मागे हटत नाही. याची प्रचिती म्हणून बाणेर येथील ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी पूरग्रस्तांसाठी अकरा लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केली.

धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. दिलीप मुरकुटे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. एक ज्येष्ठ शिवसैनिक कोणतेही पद नसताना जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून येतो हे फार कौतुकास्पद आहे. डॉ दिलीप मुरकुटे यांच्या कार्याचा बोध घेऊन इतर शिवसैनिकांनी देखील समाजातील अडचणीत असणाऱ्या नागरिकांना मदत करावी असे आव्हान यावेळी त्यांनी केले.

बाणेर येथील शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी नेहमीच समाजा प्रती बांधिलकी ठेवून गरजवंतांना मदत केली आहे. समाजातील नागरिकांना अडचणीच्या वेळेस मदतीला धावणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. दिलीप मुरकुटे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्याची माहिती देताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, कोरोना महामारी नंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत असतानादेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मोठ्या नेटाने सर्व अडचणींचा सामना करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा, आधार देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदर्श घेत एक शिवसैनिक देखील सामान्य नागरिकांना अडचणीतून बाहेर काढण्याकरिता मागे राहत नाही. म्हणून माणुसकीच्या नात्याने अडचणीत असणाऱ्या पूरग्रस्त बांधवांना मदत करणे कर्तव्य आहे. म्हणून हि मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर,सहकार सेनेच्या राज्य अध्यक्षा शिल्पा सरपोतदार, डॉ.दिलीप मुरकुटे, सहकारसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, ॲड.पांडूरंग थोरवे, राम गायकवाड, शाम बालवडकर इत्यादी उपस्थित होते. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे अकरा लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

See also  बालेवाडी येथील रहिवाशांनी कर वसुली बद्दल दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महानगरपालिकेला नोटीस