औंध मधील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करू : पोलीस आयुक्त अमितेश कुमार 

0

परिसरातील नागरीकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण ‌करू…!

औंध :

औंध परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासह जे शक्य आहे ते करु. परिसरातील नागरीकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण ‌करू,आज पासून महिनाभरात एक ही गुन्हा औंध परिसरात घडता कामा नये, तसेच औंध मधील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करु असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

औंध येथील समिर राॅय चौधरी यांच्या खुनाच्या घटनेनंतर नागरिकांनी केलेल्या कॅन्डल मार्च ची दखल घेत, व अँड. मधुकर मुसळे यांनी आयुक्तांची मंगळवारी सकाळी भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर लगेच संध्याकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वेस्टन मॉल चौक ते क्लारीअन पार्क सोसायटी पर्यंत पायी चालून समस्याचा आढावा घेतला व नागरिकांची संवाद साधला या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यावेळी अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ-४ चे उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शफिल पठाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आयुक्त म्हणाले की, परिसरात या घटनेमुळे निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना स्वाभाविक असून भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी आमचा प्रयत्न आहे. रस्त्यावर व पदपथावर कोणीही व्यवसाय करणार नाही व वाहतूकीला अडथळा ठरणार नाही यासाठी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. औंध परिसराला शिस्त लावण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यासह गुन्हेगारानवर वचक राहण्यासाठी व्यूहरचना केली जाईल.परिसरातील फेरीवाले,

हातगाडी,पथारी व्यावसायिक, टप-या किंवा झोपडपट्टीच्या आसपास कुठलीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही‌ व संबंधितांवर कठोर कारवाई करावी यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत असेही ते म्हणाले.

याचबरोबर जेथे मारहाण झाली त्या घटनास्थळाची व वेस्टएंड चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान आयुक्तांनी ॲड.मधुकर मुसळे, माजी नगरसेवीकाअर्चना मुसळे व स्थानिक नागरिकांसह पायी चालत काही ठिकाणांची पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला.

See also  "सर्व सामान्यांसाठी योगीराज पतसंस्थेचे मोठे योगदान " : माजी आमदार विजय काळे

या बैठकीत प्रसंगी बोलताना ॲड.मधुकर मुसळे यांनी सांगितले की, या घटनेमुळे भीतीमय वातावरण निर्माण झाले होते. परत लगेचच चोरीच्या घटना घडल्याने पुन्हा नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. गुन्हेगारीवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. प्रकरण वाढण्यापुर्वीच सुरुवातीला गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.