केविन अॅप मधील तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतरच पुढील लसीकरणा.

0

मुंबई:

 कोविड १९ लसीकरणासाठी ऑफलाइन नोंदणी करू नये व कोवान अॅप मार्फतच नोंदणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी मुंबईसह राज्यात लसीकरण होणार नाही. अॅपबाबतचे तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतरच पुढील लसीकरणाला सुरुवात होईल, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

मुंबईत शनिवारी झालेल्या लसीकरणादरम्यान काही जणांची कोविन अॅपवरून नोंदणी झाली नाही. त्यांना दूरध्वनी करून लस घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. शनिवारी ऑफलाइन नोंदणी केंद्राच्या निर्देशानुसार करण्यात आले होते, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश  काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

अॅपमधील अडचणी असल्याने आणि पुढे जाऊन नवीन लसी येतील तेव्हा नोंदणीत अडचणी येण्याची शक्यता असल्याने लसीकरण तूर्त दोन दिवस होणार नाही, असे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. कोविड १९ लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोविन ॲप मध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये दि. १८ जानेवारी पर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्ता संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागानेही स्पष्टीकरण दिले आहे.

See also  विमा क्षेत्रात 74 टक्के थेट परकीय गुंतवणूकीचा मार्ग मोकळा