माॅडर्न गणेशखिंड आता आर्थिक साक्षरतेचे DEA Fund RBIचे महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त केंद्र असलेले एकमेव महाविद्यालय

0

गणेशखिंड :

गणेशखिंड येथिल माॅडर्न महाविद्यालयाला रिझर्व्ह बँकेने आर्थिक साक्षरता केंद्र म्हणून अधिकृत मान्यता दिली. या साठी महाविद्यालयाला दर तीन महिन्यांनी आर्थिक साक्षरतेसाठी मिळणारे अनुदान जाहीर झालेले हे एकमेव महाविद्यालय आहे.

गणेशखिंड मधील वाणिज्य विभागाच्या फ्युचर्स बँकर्स फोरमने आर्थिक साक्षरतेसाठी वेगवेगळे कार्यक्रम समाजासाठी घेतले आहेत. फ्युचर बँकेच्या बँक मित्र या उपक्रमाद्वारे समाजासाठी अनेक उपक्रम राबवलॆ जातात. यामध्ये प्रधानमंत्री जन धन खाते उघडण्यासाठी मदत करणे जनसुरक्षा योजनेची जनजागृती व असंघटीत विभागासाठी बँक अकाउंट उघडणे व या योजनामधे सामील करुन घेण्यासाठी मदत करणे, वेगवेगळ्या लोकांसाठी मेडिएटर म्हणून काम करणे इ कामे हा फोरम करतो तसेच ११ आँगस्टला RBI चे पहिले गव्हर्नर श्री सी डी देशमुख यांच्या स्मरणार्थ बँकिग दिवस म्हणून साजरा केला जातो , १४ फेब्रुवारीला माय नेशन माय फ्राईड साजरा करणे, नविन वर्ष आजी आजोबांबरोबर साजरे करणे, त्यांना बँक व्यवहारासाठी मदत करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साठी बँक, ईन्शुरन्सव गुंतवणूक कनेक्ट हा कार्यक्रम, पॅन कार्डचा कार्यक्रम असे आर्थिक साक्षरतेचे विविध कार्यक्रम बँकिंग फ्युचर्स फोरम गेली १० वर्ष घेत आहे.

महाविद्यालयाने २००९ पासून विद्यार्थ्यांना बँकेत जाऊन ट्रेनिंग घेणे सक्तीचे केले. यासाठी विद्या सहकारी बँकेशी २००८ पासुन टाय अप आहे तसेच २०२१ पासुन बँक आँफ महाराष्ट्र, काँसमाँस बँक महाविद्यालयाने टाय अप केलेले आहे.

या कार्याची दखल घेऊन डिपाॅझिटरी एज्युकेशन अवेरनेस फंड (DEAF) RBI अंतर्गत आर्थिक साक्षरता केंद्र म्हणून मान्यता दिली. यापुढेही सातत्याने आर्थिक पाठबळ या कार्यक्रमासाठी लाभणार आहे.

८ एप्रिलचा हा कार्यक्रम शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरता अभियान निमगाव म्हाळुंगी येथे घेतले. सरकारच्या विविध योजना गावकऱ्यांना पोहोचण्यासाठी ‘ फ्युचर्स बॅकर्स फोरमच्या’ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यात जनधनयोजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना इ माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी मुंबईहुन रिझर्व्ह बँकेचे एल डी ओ श्री निखिल गुलाक्षी हे खास उपस्थित होते. त्यांनी RCT ट्रेनिंग घेतल्यास बचत गटाला लगेच कर्ज मंजूर होईल. ग्राहक आपल्या तक्रारीची दाद बँकिंग ombudsman कडे करु शकतात. टर्म इश्युरन्सन सर्वांनी काढावा आणि बँक खा्त्याला वारसदाराचे नाव लावायला विसरू नका असे मार्गदर्शन केले.

See also  निरोगी समाजाचे स्वप्न साकार व्हावे व गोरक्षा संस्कृतीचे संवर्धन व्हावे : सनी निम्हण

यानंतर निवृत्त अधिकारी, पुणे पीपल्स को आँपतेटिव्ह बँक श्री सदानंद दिक्षित व श्री पी एस सरडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, बँक आँफ महाराष्ट्र यांनी मार्गदर्शन केले.
श्री पी एस सरडे म्हणाले पुणे जिल्हा हा सरकारच्या योजना राबविण्यात अग्रेसर आहे. या सर्व योजनांची चर्चा ग्रामसभेत झाल्यास त्या सर्व गावकऱ्यांपर्यंत पोहोचतील. बचत गटात आज ७% ने कर्ज मिळते त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा म्हणून प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे.

श्री सदानंद दिक्षित, Ex CEO पुणे पीपल्स को आँपरेटिव्ह बँक म्हणाले भारतामधे सर्वात स्वस्त विमा मिळतो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,अटल पेंशन योजना या सर्वांसाठी आहेत. सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावे.

संपूर्ण कार्यक्रमात श्री बापू काळे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य यांचे खुप सहकार्य लाभले. महिलांच्या आर्थिक साक्षरते साठी गावाचे पूर्ण सहकार्य लाभेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी गावचे सरपंच सौ सविताताई कर्पे,उपसरपंच कविताताई चौधरी, माजी उपसरपंच तनुजाताई विधाटे, उद्योजक विजयदादा कर्पे हे उपस्थित होते. पी. ई. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर याप्रसंगी उपस्थित होते.त्यांनी अशा कार्यक्रमाला महाविद्यालय कायम मदत करेल असे सांगितले.

या वेळी एम.काॅमच्या विद्यार्थ्यांनी विविध योजनांवर संशोधन केले आहे. व त्याचा अहवाल DEF ला सादर केला जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन फ्युचर्स बँकर्स फोरमच्या आध्यक्ष प्रा विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी केले.डाॅ मंजुषा कुलकर्णी, डाॅ पल्लवी निखारे, प्रा अदिती पिंपळे यांनी सहकार्य केले. डाॅ शुभांगी जोशी यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी सर्वांचे अभिनंदन केले.हा संपूर्ण कार्यक्रम निमगाव म्हाळुंगी मधील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी सहकार्य देऊन यशस्वी केला. यामधे मोठ्या प्रमाणात बचत गटाच्या महिला व शॆतकरी उपस्थित होते.