निरोगी समाजाचे स्वप्न साकार व्हावे व गोरक्षा संस्कृतीचे संवर्धन व्हावे : सनी निम्हण

0

औंध :

माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी आयुर्वेदिक उत्पादनांची पन्नास टक्के सवलतीत विक्री आणि प्रदर्शन 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले. प्रदर्शनास सुरुवात गौरी देशपांडे, माधवी डहाके फळकर, गणेश कलापुरे, सुप्रीम चोंधे यांच्या प्रमूख उपस्थित करण्यात आली. या प्रदर्शनास फार मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिला. या उत्पादनांची विक्री सानेवाडी, नागरस रोड, रोहन निलय या ठिकाणी करण्यात आली.

या प्रदर्शनाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, गाय ही आपल्या संस्कृतीचा मानबिंदू आहे. गोधन संपूर्ण विश्वाचा आधारभूत घटक असून नैसर्गिक संतुलन ठेवण्यासाठी गोवंशाचा सांभाळ आणि उद्धार करणे हे आपल्या संस्कृतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गाईचे कृषी, आरोग्य, पर्यावरण, अध्यात्म, रोजगार, ऊर्जा अशा सर्वच क्षेत्रातील वैज्ञानिक महत्त्व फार मोठे आहे. गाई आपल्यासाठी एक उपयुक्त आणि आरोग्याच्या दृष्टीने संजीवक आहे. म्हणूनच निरोगी समाजाचे स्वप्न साकार व्हावे व गोरक्षा संस्कृतीचे संवर्धन व्हावे या दृष्टीने गो संजीवनी आयुर्वेदिक उत्पादनाची 50% सवलतीत विक्री करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी आयुर्वेदिक उत्पादने, दुग्धपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यांची विक्री करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गोमूत्र अर्क, गोमूत्र रसार्क, नंदिनी हर्बल साबण, फेस पॅक 40 ग्रॅम, नंदिनी स्किन क्रीम, गोमय उठणे 100 ग्रॅम, गोमय साबण, नंदिनी हर्बल तेल, स्नानादी विलियन बाथ जेल प्लस शाम्पू छोटा आणि मोठा, नंदिनी फ्लोअर क्लीनर 1 लिटर, लाल दंतमंजन 40 ग्रॅम, काळे दंतमंजन 40 ग्रॅम, देशी गिर गाईचे तूप 500 ग्रॅम, धूप अगरबत्ती 20 काड्या, गोमूत्र 100 मिली, इत्यादी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.

See also  औंध येथील घरफोडी करून पसार झालेल्या मुख्य गुन्हेगाराला अटक.