पाषाण :
ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज, मुंबई, इंडीया यांचे परवानगीने व दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा आयोजित, पुणे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिकेट खेळाडूंचे निवड चाचणी शिबिर दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2022 कोकाटे स्पोर्ट्स अकॅडमी, पाषाण,पुणे. येथे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू राजू मुजावर,अनिल कोकाटे, संजय दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.सदर शिबिरास पुणे शहर व जिल्ह्यातून 27 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
दोन दिवसीय शिबिरांमधून खालील खेळाडूंची निवड झालेली आहे :
१)कुणाल फणसे.२)वृशांत गुंजाळ.३)सोमनाथ नलावडे. ४)गणेश नवघणे.५)चैतन्य जाधव.६)जितेश तामाचिकर. ७)अश्विन शिंदे.८)अतुल सुर्वे. ९)अनंता फटाले.१०)निशांत जामसुतकर.११)साहिल शेख. १२)गणेश कापरे १३)विश्वास १४)स्वप्निल राजीवडे.१५) महेश देवघण.१६)अर्जुन दहिफले.१७) धीरज सिंग.१८) राहुल खंडेलवाल.(सर्व खेळाडू)
प्रशिक्षक – संजय दारवटकर, व्यवस्थापक – शरद सावंत
असा हा पुणे जिल्ह्याचा दिव्यांग क्रिकेट खेळाडूंचा संघ निवडण्यात आला असुन या संघाला भविष्यात सर्व स्पर्धा खेळण्यासाठी भरपुर शुभेच्छा. या दोन दिवसीय शिबिरासाठी विनोद देशपांडे, सायली पोंक्षे, गणेश खांदवे, राहुल पांगारे, डॉक्टर प्रवीण शिंदे, शरद सावंत, राजेश्वरी पाटील. या मान्यवरांनी शिबिरास उपस्थित राहून दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.सदर दोन दिवसीय शिबिराचे आयोजन दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे सचिव व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू राजू मुजावर व विवेक डफळ यांच्या प्रयत्नातून व्यवस्थितरीत्या पार पाडण्यात आले.