गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल औंध येथे भा. ज. प तर्फे लाडू वाटून जल्लोष….

0

औंध :

भारतीय जनता पक्षा तर्फे गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी औंध तसेच भारतीय जनता पक्ष सदस्य सचिन मानवतकर यांच्या वतीने शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मतदार संघ भारतीय जनता पक्ष अध्यक्ष रवींद्र साळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औंध येथे लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

गुजरात येथील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी केले व गुजरात विधानसभेत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत प्राप्त करून दिले या भारतीय जनता पक्षाच्या यशाचा आनंद उत्सव फटाक्याचे आतिषबाजी करून तसेच लाडू वाटून औंध येथील परिहार चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच हीच गुजरात विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये करायचे आहे असे मान्यवरण तर्फे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. यावेळी कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, प्रकाश सोलंकी, नितीन रणवरे, गणेश कलापुरे, अजय दुधाने ,सुप्रीम चोंधे, अरविंद पाटील, सुरज गायकवाड, मनोज ठोसर ,कैलास ठोसर, अक्षय घडसिंग, अजय नागटिळक, सुनिता निजामपूरकर, सुभद्रा कुंभार तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सचिन मानवतकर मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते.

See also  माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराने आकस्मित निधन