माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराने आकस्मित निधन

0

माजी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराने आकस्मित निधन

सोमेश्वरवाडी : शिवाजीनगरचे माजी लोकप्रिय आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराने आकस्मित निधन झाले आहे. अंत्य दर्शन सायंकाळी ६ : ०० वाजता राहत्या घरी सोमेश्वर वाडी येथील झुंज बंगला येथे होईल. तर अंत्यविधी रात्री नऊ वाजता पाषाण स्मशान भूमी इथे होणार आहे.

कार्यसम्राट आमदार म्हणून प्रसिद्ध असणारे विनायक (आबा) निम्हण यांच्या अचानक निधनाने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सनी वल्र्ड्स चे मालक असणारे आमदार विनायक निम्हण माजी नगरसेवक सनी निम्हण यांचे वडील व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते.

See also  GST वरील विलंब शुल्क माफ...