बाणेरच्या सावरी शिंदे हिने दुबई येथे एशियन गेम पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये कंस्यपदक पटकावल्याने माधवबाग सोसायटीच्या वतीने सन्मान.

0

बाणेर :

बाणेर गावची कन्या कु. सावरी सूर्यकांत शिंदे हिने दुबई येथे दि. 1 डिसेंबर ते 7डिसेंबर 2022 रोजी एशियन गेम पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये 405 kg वजन उचलुन ब्रांझ मेडल मिळविले. तिच्या कर्तृत्वामुळे बाणेर गावचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले. अतियश खडतर प्रवास करत यश संपादन केलेल्या सावरी शिंदे हीचा माधव बाग अपार्टमेंट परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बाणेरगाव प्रवेशद्वार येथून माधवबाग अपार्टमेंट पर्यंत भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक करताना अमर लोंढे यांनी सांगितले की, बाणेर च्या इतिहासात जागतिक पातळीवर पदक मिळविलेली पहिलीच खेळाडू होण्याचा मान सावरी शिंदे हिने मिळविला हि अभिमानाची बाब आहे. सावरी च्या आई ने वडिलांच्या पाश्चात्य खंबीर पणाने मुलीला उभे तर केलेच स्वतः देखील वकिली शिक्षण पुर्ण करुन आपले कुटुंब चालवले.म्हणूनच सावरी बद्दल अभिमान आनी आई बद्दल गर्व वाटतो.माधव बाग सोसायटीने सावरीचे पालकत्व जपले असून नेहमीच सर्व खंबीर पणाने तिला पाठबळ देतात. हि सुरूवात असुन भविष्यात आणखी उंच भरारी सावरी ने घ्यावी अशी अपेक्षा आहे.

सत्काराला उत्तर देताना सावरीने सांगितले की, आई ने खंबीर पणाने मला पाठबळ दिले. मला घडविण्यात खुप कष्ट घेतले. प्रशिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि माधवबाग सोसायटी मधिल सर्वांनी मला नेहमीच मदत केली. हि सुरूवात आहे पुढे अजुन बरच काही मिळवायचं आहे.

योगीराज पथासंस्थेच्या वतीने सावरी शिंदे यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलणार असुन माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि गणेश कळमकर यांनी सावरीला प्रोत्साहन द्यावे म्हणून एक लाख रुपये चेक यावेळी दिला. यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धे करता लागणारा सर्व खर्च स्पर्धेचा खर्च युवा नेते राहूल बालवडकर करणार आहेत.

यावेळी माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, अशोक मुरकुटे, राहुल बालवडकर, जीवन चाकणकर यांनी सावरी शिंदे हिला यावेळी शुभेच्छा दिल्या.

See also  सचिन दळवी यांच्या वतीने वै.गुरुवर्य बाळोबा सुतार पाषाणकर दिंडी क्रमांक ३३ मधील वारकऱ्यांसाठी पावसाळी रेनकोट भेट...

यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, भाजपा नेते प्रकाश बालवडकर, राष्ट्रवादी नेते विशाल विधाते, अर्जुन शिंदे, जीवन चाकणकर, संजय ताम्हाणे, नितीन कळमकर, आणि सोसायटी मधील नागरीक आणि बाणेर ग्रामस्थ उपस्थित होते.