24 व्या क्रीडा महोत्सव स्पर्धेचे औरंगाबाद येथे यशस्वी आयोजन

0

औरंगाबाद :

दिनांक 02 डिसेंम्बर ते 07 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे संपन्न झाल्या. पंच प्रमुख दत्ता झिझुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे स्पर्धा यशस्वी झाल्या.

सदरील स्पर्धेत पुरुष विभाग कबड्डी स्पर्धेत डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सुवर्णपदक पटकावले तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाने रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने कांस्यपदक पटकावले.

महिला विभागात सावित्रीबाई फुले विद्यापीठाने
सुवर्णपदक, मराठवाडा विद्यापीठाने रौप्यपदक आणि मुंबई विद्यापीठाने कांस्यपदक पटकावले.
सदरील स्पर्धेसाठी 22 पुरुषांचे संघ तर 20 महिलांच्या संघांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेसाठी पंचप्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे यांनी काम पाहिले. राज्यभरातील अनेक पंचांच्या उत्कृष्ट कामगिरीने स्पर्धा यशस्वी झाली अशी प्रतिक्रिया बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे क्रीडा संचालक दयानंद कांबळे यांनी व्यक्त केली.

See also  पाचव्या कसोटीत पराभवाबरोबरच भारताची आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद शर्यत खडतर