सचिन दळवी यांच्या वतीने वै.गुरुवर्य बाळोबा सुतार पाषाणकर दिंडी क्रमांक ३३ मधील वारकऱ्यांसाठी पावसाळी रेनकोट भेट…

0

सोमेश्वरवाडी :

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर पायी वारीसाठी सोमेश्वरवाडी, पाषाण आणि सुतारवाडी येथील वै.गुरुवर्य बाळोबा सुतार पाषाणकर दिंडी क्रमांक 33 मधील वारकऱ्यांनी नुकतेच प्रस्थान केले. यावेळी भाजपा युवा नेते सचिन दळवी यांच्या वतीने प्रस्थान करणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी त्यांचा पावसाळा पासून बचाव व्हावा या दृष्टीने खास बनवून घेतलेला पावसाळी रेनकोट भेट देण्यात आले.

यावेळी युवा नेते सचिन दळवी म्हणाले की, सोमेश्वरवाडी पाषाण सुतारवाडी परिसरातील बहुसंख्य नागरिक पंढरपूर वारीसाठी जात असतात. यावेळी उपस्थित राहून वारकऱ्यांना निरोगी आरोग्य राखत वारी पूर्ण करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.तर पंढरपूरची वारी सुरू असताना पाऊस हमखास येतच असतो. अशावेळी या वारकऱ्यांना पावसापासून सुरक्षा मिळावी म्हणून पावसाळी रेनकोट बनवून घेतला व तो वारकऱ्यांना दिला आहे. पंढरपूरची वारी कोणतीही विघ्नहर्ता सुखरूप आणि वारकऱ्यांना निरोगी आरोग्य राखत पूर्ण व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

त्यावेळी मोठया संख्येने परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून वारीला जाणाऱ्या गाड्यांचे पूजन करून पालखी प्रस्थान करण्यासाठी शूभेच्छा दिल्या.

See also  लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित बालेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साईकृपा सोसायटी संघ विजयी