सुतारवाडी :
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर पायी वारी सुतारवाडी दिंडी क्र.६ (रथापुढे) गाड्यांचे पंढरपूर पायी वारी साठी प्रस्थान करण्याकरिता गाड्यांचे पूजन सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार(अध्यक्ष सुतारवाडी दिंडी क्र. ६) व भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पुनित जोशी, ह.भ.प. दत्तात्रय महाराज दहिभाते, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी स्विकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्यावतीने वारकऱ्यांसाठी औषध पेटी भेट देण्यात आली. माहिती देताना शिवम सुतार यांनी सांगितले की, सुतारवाडी गावाला सांप्रदायिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी सुतारवाडी दिंडी क्रमांक ६ (रथापुढे) गाड्यांचे प्रस्थान झाले. यावेळी सर्व वारकरी माता-भगिनींना ही पायी वारी आरोग्यदायी आणि उत्साहाने संपन्न व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या. विठू नामाच्या जयघोषामध्ये दिंडिने प्रस्तान केले.
या वेळी विठ्ठल सुतार, विनोद खेडेकर, अंकुश रणपिसे बाळासाहेब सुतार, उद्योजक अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, दयानेश्वर भेगडे, बबन सुतार, जयसिंग सुतार, हभप बबन भेगडे, शंकर रणपिसे, मुरलीधर तापकिर, कुसुम बाई सुतार, लता सुतार, संगीता देवकर, सविता रणपिसे, बाईडा बाई रानवडे, छबाबाई रणपिसे, मंगल रणपिसे, सुशीला रणपिसे आदि उपस्थित होते.