बालेवाडी :
लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने बालेवाडी, बाणेर, सुस म्हाळुंगे येथील सोसायटी अंतर्गत भरवण्यात आलेल्या बालेवाडी प्रीमियर लीग या फुल पीच टेनिस बॉल स्पर्धेच्या आज शेवटच्या दिवशी रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात साईकृपा सोसायटी संघ विजयी ठरला तर उपविजेेपद पारितोषिक राहुल अर्कस या संघाने पटकावले. इक्वीलाईफ व परफेक्ट 10 हे सोसायटी संघ अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर विजयी ठरले. या सोसायटी संघास प्रथम क्रमांकास ४४,४४४ रू. रोख पारितोषिक व चषक द्वितीय क्रमांकस ३३,३३३रू. व चषक तृतीय क्रमांकास २२,२२२ रू व चषक चतुर्थ क्रमांकास ११,१११. रू व चषक देण्यात आला
बालेवाडी मधील साई चौक येथील साई स्पोर्ट्स मैदान येथे भरविण्यात आलेल्या बालेवाडी प्रीमियर लीग मधे परफेक्ट 10, पार्क एक्सप्रेस, अलदिया, राहुल अर्कस, ओरवी, इक्वीलाईफ, लेबरनम्स, रिद्धी सिद्धी, पलाझो व साईकृपा हे सोसायटी संघ सहभागी झाले होते. तर परफेक्ट 10 प्रीमियर लीग स्पर्धेत हल्क, स्पार्टन, ग्लॅडिएटर्स व रॉयल्स हे संघ सहभागी झाले होते. या मध्ये हल्क या संघाने सामनावीर हा किताब पटकवला तर ग्लॅडिएटर्स या संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले.
स्पर्धेचे मुख्य आयोजक लहू बालवडकर यांनी सांगितले की, दररोजच्या धावपळीच्या जीवनातून सोसायटीतील नागरिक वर्गांसाठी स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशावेळी शरीरावर येणारा ताण कमी करण्याकरिता खेळाची आवश्यकता असते. म्हणुनच सर्व सोसायटीतील नागरिकांसाठी ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये सोसायटी वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला तसेच महिलांनी ही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखविली.
या स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाला नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, नितीन रनवरे, किरण बालवडकर, संतोष तापकीर, प्रतिक बालवडकर, संदिप तापकिर, सागर कोळेकर, अमेय जगताप, उमेश चौधरी, पत्रकार केदार कदम, मोहसीन शेख, अर्जुन पसाले, शितल बर्गे, अभिराज भडकवाड, शामल खेरणार हे प्रमुख पाहुणे म्हणुन व साई स्पोटसचे सर्व खेळाडु सोसायटी मधील महिला सर्व रहिवाशी प्रेषक मोठ्या संख्येने उपस्थित होते.