सातत्यपूर्ण मूल्यमापन निट राबवले तर भारत सुपर पावर होईल इतकी क्षमता नविन शैक्षणिक धोरणात : डाॅ संजीव सोनवणे, प्रकुलगुरु, साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ

0

सातत्यपूर्ण मूल्यमापन निट राबवले तर भारत सुपर पावर होईल इतकी क्षमता नविन शैक्षणिक धोरणात : डाॅ संजीव सोनवणे, प्रकुलगुरु, साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे :

पी ई सोसायटीने आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ शिवाजीनगर येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला. या प्रसंगी १० व १२ चे १००% निकाल असलेल्या ७ शाळा व महाविद्यालये यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मा डाॅ संजीव सोनावणे प्रकुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डाॅ. संजीव सोनावणे म्हणाले,”नविन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी शिक्षकांनी ती समजून घेणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण मूल्यमापन हे जर निट राबवले गेले तर भारत सुपर पावर होईल इतकी क्षमता नविन शैक्षणिक धोरणात आहे. हे यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.” या संस्थेचा किर्तीगंध चहुबाजुला पसरला आहे. देशाच्या प्राधान्यक्रमावर काम करणारी ही संस्था आहे. ”

डाॅ गजानन एकबोटे म्हणाले की, २०३२ पर्यंत नविन शैक्षणिक धोरण राबवायचे आहे. २ वर्षात पुणे विद्यापीठ समर्थपणे पेलेल व देशात आदर्श घालून देईल.पी ई सोसायटी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा वसा हि ८८ वर्ष चालवित आहे.

या वेळी खालील ‘माॅडर्न ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला…………..
दिक्षा चंद्रकांत बोडके(९९.६०%) माॅडर्न महाविद्यालय शिवाजीनगर, तनुजा शेळके (९७.२०%), माॅडर्न महाविद्यालय निगडी इंग्रजी माध्यम, हर्षे यश(९६.२०%) माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड, श्रेया जाधव(९५.६०%) पी इ एस गर्ल्स हायस्कूल हे १० वी तील गुणवंत विद्यार्थी
तेजस कोल्हे, यश होडलर (वि न)science, हर्ष गोयल, ऋतुजा राऊत (वाणिज्य), सई माळवदकर (कला) या १२ वी तील गुणवंत विद्यार्थी

तसेच या प्रसंगी एल एल एम च्या परीक्षेत कै. नानी ए पालखीवाला व कै. दादासाहेब अभ्यंकर लक्ष्मेवार सुवर्ण पदकांसहित एकुण ६ पारितोषिके घेणाऱ्या माॅडर्न विधी महाविद्यालयाच्या कु. अर्चना देशपांडे, माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथील एम स्सी बायोटेक मधे सुवर्णपदक घेणाऱ्या कु. सिमरन नार्वेकर, रोहन कुलकर्णी, माॅडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट, शिवाजीनगर, यांच्या सहित १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी नाटक ‘ काय समजलिव ‘ या नाटकासाठी फिरोदिया करंडक स्पर्धेमधे १४ बक्षिसे मिळवणार्या लेखन व दिग्दर्शनासाठी प्रतिक्षा शेलार हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

See also  औंध येथे 'काव्य अटल' उपक्रम उत्साहात संपन्न.

कार्यक्रमाची सुरवात मुकेश जाधव सर यांच्या ईशस्तवनाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डाॅ. जोत्स्ना एकबोटे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शामकांत देशमुख, सचिव, पी ई सोसायटी यांनी केले. सुञसंचालन डाॅ वैजयंती जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन गणेशखिंडचे प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी केले.

या कार्यक्रमाला नियामक मंडळाचे सदस्य, अजीव मंडळाचे सदस्य,विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यालयांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.