पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी पुणे बार असोसिएशन वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन..

0

पुणे :

पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या साठी महाराष्ट्र राज्याचे नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे बार असोसिएशन वतीने अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे व उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर होते, पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही १९७८ म्हणजे ४४ वर्षे जुनी मागणी ला न्याय देण्याचा दृष्टीने आज पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे बार च्या बहुसंख्य सदस्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सदर निवेदनात मुंबई उच्च न्यायालयात दाव्यांची संख्या ही राज्यात सर्वाधिक असुन, त्याचा लवकर निपटारा व्हावा आणि सर्वसामान्य जनतेला लवकर न्याय मिळावा म्हणून मागणी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ साठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा या इतर सर्वांच्या पेक्षा अधिक आहेत आणि त्यामुळे खंडपीठ पुण्यात व्हावे यासाठी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे आणि शिवसेनेचे रमेश कोंडे यांनी सदर भेट घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पुणे बार असोसिएशन च्या या मागणी चा सरकार योग्य विचार करून पुण्यावर अन्याय होणार नाही असे मा एकनाथ शिंदे यांनी पुणे बार असोसिएशनचे सदस्य यांना आश्वासन दिले.

सदर प्रसंगी उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मण येळे पाटील सेक्रेटरी – ॲड. सुरेखा भोसले, खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले, ॲड. अमोल दुरकर ॲड.तेजस दंडागव्हाळ, ॲड. कुणाल अहिर, ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.

See also  प्रभाग रचना आराखडा संबंधित अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई साठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची पोलिस ठाण्यात तक्रार...