‘लॉन बॉल’ क्रीडा प्रकारात कॉमनवेल्थ मध्ये भारतीय महिला संघाने मिळविले सुवर्ण पदक.

0

मुंबई:

‘लॉन बॉल’ या भारतीयांसाठी नव्या असलेल्या क्रीडा प्रकारात कॉमनवेल्थ मध्ये भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय महिला टीमने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. फायनल मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर 17-10 असा विजय मिळवला.

चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने सरस कामगिरी केली. आधी भारतीय महिला टीमने दक्षिण आफ्रिकेवर आघाडी घेतली होती. पण नंतर ते पिछाडीवर पडले. पण नंतर आपल्या कामगिरीचा स्तर उंचावत ऐतिहासिक सुवर्ण पदाकाला गवसणी घातली.

तिसऱ्या राऊंड मध्ये स्कोर बरोबरीत होता. त्यानंतर महिला संघाने आघाडी वाढवायला सुरुवात केली. 6 राऊंड नंतर स्कोर 7-2 होता. म्हणजे मजबूत स्थिती होती.

10 व्या एन्ड नंतर दक्षिण आफ्रिकेने 8-8 अशी बरोबरी साधली.

12 व्या एन्ड नंतर भारताने पुनरागमन केलं. दोन्ही संघांचे स्कोर आता 10-10 असे बरोबरीत होते.

14 व्या एन्ड मध्ये भारतीय संघाने 3 पॉइंटस मिळवले. भारताची दक्षिण आफ्रिकेवर 15-10 अशी आघाडी झाली. त्यानंतर थेट सुवर्णपदक विजेती कामगिरी केली.

 

See also  विम्बल्डनचा अंतिम सामना जोकोविच विरुद्ध किर्गियोस यांच्यात रंगणार.