मंत्रिमंडळ नसलं तरी सरकार चांगलं चाललंय : एकनाथ शिंदे

0

पुणे :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुणे विभागाच्या पाच जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीने झालेल्या शेती, जीवितहानीचा आढावा घेतला.

त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या आगामी पेरणी, पीकविमा, सिंचन सुविधा यांचा देखील आढावा घेतला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, हे पैसे राऊतांच्या घरी मिळाले.त्यामुळे त्यावर मी लिहू शकत नाही की, ते कोणी दिले आहेत.ते त्यांनाच विचारलं पहिजे. तसेच, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिमंडळ नसलं तरी सरकार चांगलं चाललंय. शेतकऱ्यांना मदत दिलीय, पेट्रोल-डिझेल कमी केलं, वीजदर कमी केले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.एकनाथ शिंदे हे आज पुणे जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,त्याचबरोबर त्यांनी शेतीसह अनेक नागरी प्रकल्पांचा देखील आढावा घेतला. तर स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवानिमित्त केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा मोहीम’ यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं अवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी, त्यांनी विविध विकास कामांच्या घोषणा केल्या.

See also  तब्बल ३ हजार ८६० रक्तदात्यांनी महापौरांना दिल्या रक्तदानरुपी शुभेच्छा.