औंध येथील ‘उडान क्लास’ मधील गरजू विद्यार्थ्यांना आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त यांच्या सुखाई प्रतिष्ठान मार्फत शालेय साहित्य वाटप.

0

औंध :

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त कस्तुरबा वसाहत औंध येथील ‘उडान क्लास’ मधील गरजू विद्यार्थ्यांना सुखाई प्रतिष्ठान मार्फत शालेय साहित्य देण्यात आले.

याची माहिती देताना सूखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगितले की, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, संपूर्ण शालेय साहित्य मिळावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण काहीना आर्थिक अडचणीमळे या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. दिपाली गायकवाड आणि आरती शेळके या दोघी कस्तुरबा वसाहत मधे उडान या नावाने क्लास चालवतात. अगदी नर्सरीच्या विद्यार्थ्यां पासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या ट्युशन देतात.

दिपाली गायकवाड यांनी आमच्याकडे क्लास मधील विद्यार्थ्यांच्या समस्या सांगितल्या. अनेक विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, ट्युशन साठी वह्या, गणित आणि भूमिती सोडवण्यासाठी लागणारे साहित्य, अभ्यासा सोबत कलेचीही साथ हवी म्हणून ड्रॉइंग बुक आणि रंग अशा प्रकारचे साहित्य मिळावे यासाठी विनंती केली. व तत्काळ सुखाई प्रतिष्ठानच्या वतीने ही मदत देण्यात आली. सुखाई प्रतिष्ठान नेहमीच समाज हिताचे काम करेल असे त्यांनी सांगितले.

अविनाश कांबळे यांनी समाजात आपल्या सत्कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते नेहमीच समाजातील वंचित समाजासाठी पुढे येऊन काम करतात. समाजातील प्रत्येक घटकाला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे ही त्यांची तळमळ असते. त्यांनी दिपाली गायकवाड यांनी जे शालेय साहित्य सांगितले ते तात्काळ मागवून घेतले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.

See also  अंतिम चेंडूवर षटकार खेचत बॉडी गेट संघाने मिळविले ए.बी.बी. चषकाचे विजेतेपद.