… तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडवू! : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

0

बालेवाडी :

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेला हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ लागणार असेल, तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यासाठी महापालिकेने आवश्यक परवानगी आणि पायाभूत सुविधा निर्माण करुन द्याव्यात असे आवाहन आ.‌पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केले.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर येथे बैठक झाली. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर, स्थानिक माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, लहू बालवडकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, पिडीसिसी बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, नगरसेविका रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक १२ च्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, ॲड. मधूकर मुसळे, मंदार रारावीकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, जीवन चाकणकर, सुर्यकांत भुंडे, दिपक दगडे, योगेश सुतार, डॉ सागर बालवडकर तसेच परिसरातील सोसायट्यांचे चेअमन आणि नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत आयुक्त डॉ. विक्रम कुमार म्हणाले की, सूस, म्हाळूंगे ही गावे महापालिकेत नुकतीच नव्याने समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सध्या पायाभूत सुविधा महापालिकेकडे नाहीत. त्या उभ्या करण्यासाठी काही वेळेची गरज आहे. पण बाणेर, बालेवाडी, पाषाण मध्ये तशी स्थिती नाही. बाणेर बालेवाडी पाषाण मध्ये पायाभूत सुविधा आहेत.

See also  बालेवाडी येथील रहिवाशांनी कर वसुली बद्दल दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महानगरपालिकेला नोटीस

ते पुढे म्हणाले की, बाणेर बालेवाडीची पाण्याची समस्या महापालिका तीन टप्प्यांत सोडवू शकते. त्यात प्रामुख्याने पम्पिंग स्टेशनचा आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार वाढवणे. त्यासोबतच एकसमान पाणी वाटपासाठी मीटरची संख्या वाढवणे. त्याशिवाय मागणीनुसार सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करणे, आदी उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.