औंध येथील डी मार्ट मध्ये डिझेल चोरीचा प्रकार उघडकीस

0

औंध :

पेट्राेल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना महागाईचे चटके बसू लागले असून वाहनांचे इंधनावर अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. अशापरिस्थितीत औंध येथील डी-मार्टच्या परिसरात ठेवण्यात आलेले ३८ हजार ५०० रुपये किंमतीचे ४०० लिटर डिझेल चाेरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीनजणांवर पाेलीसांनी डिझेल चाेरीचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.

चतृश्रृंगी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत औंध परिसरात नागरस राेड येथे डीमार्ट (अव्हेन्यु सुपरमार्ट) आहे. सदर ठिकाणी डिजीटल जनरेटर रुमच्या बाजूस उघडया जागेत ३८ हजार रुपये किंमतीचे ४०० लिटर डिझेल आणून ठेवण्यात आले हाेते. परंतु सदर डिझेल चाेरी करुन ते चढया दराने विक्री करण्याचे उद्देशाने डीमार्ट मध्ये नाेकरी करणाऱ्या तीन इसमांनी डिझेल चाेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पाेलीसांनी अरविंद अर्जुन माळी(२२), याेगेश प्रकाश वाघमाडे (२५) व निलेश राजेश चाैधरी (२४) यांचेवर गुन्हा दाखल करत आराेपी अरविंद माळी यास अटक केली आहे. सदर आराेपी डिझेल चाेरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पाेलीसांना प्राप्त झाले असून त्याआधारे पुढील तपास चतृश्रृंगी पाेलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली आहे.

 

See also  औंध इंदिरा गांधी शाळेच्या क्रीडांगणावर असलेला राडारोडा चा ढीग उचलण्याची मागणी...