औंध इंदिरा गांधी शाळेच्या क्रीडांगणावर असलेला राडारोडा चा ढीग उचलण्याची मागणी… 

0

 

औंध :

औंध येथील इंदिरा शाळेच्या क्रीडांगणावर असणारे गवत काढल्यानंतर त्याचा गवताचा साठा तसाच क्रीडांगणावर मोठा ढीग लावून ठेवला आहे. हा ठेवण्यात आलेला गवताचा कचरा राडारोडा ढीग लवकरात लवकर उचलण्याची मागणी खेळाडू करत आहे.

क्रीडांगणावर बरेच खेळाडू सराव करत असतात त्यामूळे तिथे मुलांना खेळताना अडथळा निर्माण होत आहे. तरी हा गवताचा ढीग त्वरित उचलून मैदान खेळा साठी मोकळे करून द्यावे अशी मागणी मनीष रानवडे (पुणे जिल्हा क्रिकेट असोशिएशन सदस्य) यांनी केली आहे.

महापालिका क्षेत्रीय कार्यालय जवळ असुन देखील या मैदान कडे दुर्लक्ष केले जाते. करोना मुळे बराच काळ मैदानावर खेळाडू जावू शकत नव्हते, पण आता जायला लागल्या नंतर मैदानावर गवताच्या ढीगाचा अडथळा निर्माण झाल्या मुळे तिथे खेळायला येणाऱ्या मुलांमध्ये नाराजी आहे.

See also  ॲड. मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त औंध आयटीआय येथे वृक्षारोपण...