औंध येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मेळावा उत्साहात पार

0

औंध :

गुरुवार दिनांक 6-4-2022 रोजी शिवाजीनगर प्रकल्प पुणे, औंध येथील विरंगुळा हाॅल येथे आयोजित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मेळावा उत्साहात पार पडला.

या आयोजित मेळाव्यामध्ये अंगणवाडीच्या नियमित कामकाजावर आणि पोषण टॅंकर, मानधन, तसेच शासनाच्या धोरणांवर शुभा ताईंनी मार्गदर्शन केले. तसेच रजनीताईनी संघटना मजबूत करण्यासाठी आणि संघटनेत असल्यास होणारा फायदा ,आपली संघटना कशी कार्यरत आहे यावर मार्गदर्शन केले.

सामाजिक कार्यकर्ते सुखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी बोलताना सांगितले की, संघटनेला सुखाई प्रतिष्ठानचा नेहमी पाठिंबा राहील आणि महिलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन स्वताच्या पायावर उभे राहावे. संघटीत राहून काम केल्याने आपल्या समस्या सोडविण्याकरिता फायदा होत असतो. संघटनेमुळे कर्मचाऱ्यांना ताकद मिळते. संघटीत राहून खंबीर पणाने आपल्या समस्या सोडवाव्यात.

या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य सचिव शुभा शमीम, जिल्हा सचिव रजनी पिसाळ, शालेय पोषण पुरवठाआहार च्या जगताप ताई,आशा वर्कर, आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे आणि सर्व सेविकां आणि मदतनीस होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता माने आणि मेळाव्याचे आयोजन निवेदिता वाघमारे आणि सर्व सेविकां आणि मदतनीस यांनी केले.

See also  बोपोडी -खडकी येथील वाहतूक समस्या लवकरच सुटेल : आमदार सिद्धार्थ शिरोळे