पुणे पोलिस लखनौला पोहोचण्याआधीच किरण गोसावी फरार

0

लखनौ :

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटक प्रकरणी एकीकडे सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे फरार असलेला पंच किरण गोसावी पसार झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला किरण गोसावी उत्तरप्रदेशच्या लखनौ येथे लपून बसला होता. त्याने स्वत: पोलिसांना शरण येणार असे जाहीर केले, पण पुणे पोलिस लखनौला पोहोचण्याआधीच तो तिथूनही पळून गेल्याची माहिती आहे.

किरण गोसावीचा ठावठिकाणा मोठ्या प्रयत्नाने लागला होता. तो लखनौमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी रात्री तो पोलिसांना शरण येणार होता, पण उशिरापर्यंत तो काही आलाच नाही. पुणे पोलिसांचे पथक पोहोचण्याआधीच गोसावी लखनौमधून निघून पळून गेला.

See also  राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा : प्रवीण दरेकर