पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये महापालिकेची वैद्यकीय शहरी गरीब योजनेस मान्यता

0

पुणे:

पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये महापालिकेची वैद्यकीय शहरी गरीब योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्डधारक, झोपडपट्टीत राहणारे नागरिक आणि ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. हृदय, कॅन्सर, किडनी अशा आजारांसाठी उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपये अशी आहे. शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असणारे सर्व नियम समाविष्ट गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक राहणार आहेत. महिला आणि बालकल्याण समितीने या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने सादर केला होता

See also  प्रत्येक नगरसेवकाला बेंचेस, बाके, कचऱ्यासाठी बकेट व अन्य कामासाठी पिशव्या खरेदी साठी १० लाखाचा निधी