प्रत्येक नगरसेवकाला बेंचेस, बाके, कचऱ्यासाठी बकेट व अन्य कामासाठी पिशव्या खरेदी साठी १० लाखाचा निधी

0

पुणे :

ऐन महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना आज झालेल्या मुख्य सभेत प्रत्येक नगरसेवकाला बेंचेस म्हणजे , नागरिकांना बसण्यासाठी बाके खरेदी साठी ५ लाख रुपये आणि कचऱ्यासाठी बकेट व अन्य कामासाठी पिशव्या खरेदी साठी ५ लाख असे १० /१० लाखाचा निधी देण्याचा विषय संमत करण्यात आला.

या पूर्वीच्या काळात बेंचेस व कचऱ्याच्या बकेट मधील चर्चित घोटाळ्यानंतर या वस्तूंच्या खरेदीला महापालिका आयुक्तांनी लावलेला ‘ब्रेक’ या विषय मंजुरीने ‘सैल’ होणार आहे काय हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे

आज मुख्य सभेत वॉर्ड स्तरीय निधीतून बेंचेस, कापडी पिशव्या आणि बकेट खरेदी प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंत खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.मागील काही वर्षात नगरसेवकांनी कचऱ्याच्या बकेट, बेंचेस, कापडी पिशव्या आणि कचऱ्याच्या ढकल गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. परंतु या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.खुद्द भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनीही बेंचेस ची मुल किंमत आणि काह्र्देची किंमत यात असलेला चौपट खर्चाची तफावत काही वर्षांपूर्वीच उघड केली होती .

गेल्या २ वर्षात कोरोनामुळे मागीलवर्षी महापालिकेचे उत्पन्न घटले. यामुळे शासन आदेशानुसार महापालिकेने खर्चावर मोठ्याप्रमाणावर निर्बंध आणले आहेत. आयुक्तांनी पालिकेची विकासकामे व खरेदीची प्राथमिकता आणि निर्णय घेण्यासाठी वित्तीय समिती स्थापन केली. या समितीने उत्पन्न व खर्चाचा मेळ घालत अनावश्यक कामे व खरेदीला लगाम लावला. एवढेच नाही तर मागील दोन आर्थिक वर्षात ही खरेदी जवळपास बंद करण्यात आली होती .मात्र आज मुख्य सभेत स्थायी समितीने 2018 मध्ये मंजूर केलेला प्रस्ताव आज एकमताने मंजूर केला.या प्रस्तावानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वॉर्ड स्तरीय निधी वअन्य वर्गीकरणातून एकाच प्रभागात 5 लाख रुपयांपर्यंत बेंचेस, 5 लाख रुपयांपर्यंत बकेट किंवा पिशव्या किंवा ढकलगाडी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

See also  पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल