बिगरमानांकित दर्शन पुजारी चिपलकट्टी स्मृती कुमार गट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन ग्रांप्री स्पर्धेत अंतिम फेरीत

0

पुणे :

यजमान पुण्याच्या बिगरमानांकित दर्शन पुजारी याने येते सुरु असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती कुमार गट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन ग्रांप्री स्पर्धेत मुलांच्या एकेरीतून अंतिम फेरीत धडक मारली.

स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखादा पुण्याचा खेळाडू अंतिम फेरीपर्यंत पोचला आहे.
मॉडर्न क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य पेरीत दर्शनने पात्रता फेरीतीतून आगेकूच करणाऱ्या ध्रुव नेगीचा प्रतिकार 21-12, 21-17 असा मोडून काढला. ही लढत 39 मिनिटे चालली.
विजेतेपदासाठी त्याची गाठ आता इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित मुहम्मद हलिम अल सिदिक याच्याशी पडणार आहे. त्याने आठव्या मानांकित आयुष शेट्टीचा 21-15, 21-15 असा पराभव केला.
खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळविमाऱ्या दर्शनची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही दुसरी अंतिम लढत आहे. यापूर्वी हैदराबाद येथे झालेल्या कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय मालिकेतील स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मलेशियाच्या जस्टिन हो याने ही स्पर्धा जिंकली होती.
स्पर्धेतील प्रवास माझ्यासाठी शिकण्यासारखा होता. प्रत्येक सामन्याने मला वेगळा अनुभव दिला. स्पर्धेत चांगली कामगिरी करायची याच उद्देशाने उतरलो होतो, असे दर्शनने सांगितले. दर्शन पुण्यात स.प. महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

मुलींच्या एकेरीत पुण्याच्या सातव्या मानांकित तारा शहा हिला तिसऱ्या मानांकित उन्नती हुडा हिच्याकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. उन्नतीने सरळ दोन गेममध्ये ताराचे आव्हान 21-9, 21-17 असे संपुष्टात आणले.

पहिल्या गेममध्ये उन्नतीने 7-0 अशी वेगवान सुरवात केली. त्यानंतर ताराने ही पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण, उन्नतीचा झपाटा रोखण्यात तिला अपयश आले. उन्नतीने आपली आघाडी 14-6 अशी भक्कम केली. त्यानंतर उन्नतीने पहिली गेम सहज जिंकली. दुसऱ्या गेमला काही वेगळे चित्र दिसले नाही. उन्नतीने 8-1 अशा मोठ्या आघाडीने सुरात केली. त्यानंतर ताराने सातत्याने चिवट प्रतिकार करत पिछाडी 10-6 आणि पुढे 19-17 अशी कमी राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण भरात असणाऱ्या उन्नतीने कमालीच्या निग्रहाने खेळ करताना सलग दोन गुण घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
उन्नतीची गाठ आता थायलंडच्या सरुनरक विटिडरर्न हिच्याशी पडणार आहे. तिने अव्वल मानांकित अनुपमा उपाध्यायचा 21-17, 21-16 असा पराभव केला.

See also  पाचव्या कसोटीत पराभवाबरोबरच भारताची आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद शर्यत खडतर

निकाल (सर्व उपांत्य फेरी)
मुले एकेरी,
दर्शन पुजारी वि.वि. ध्रुव नेगी 21-12, 21-17

मुहम्मद हलीम अस सिदीक (इंडोनेशिया) वि.वि. आयुष शेट्टी 21-15, 21-15

मुले दुहेरी

चोई जियान शेंग/ ब्रायन जेरेमी गूंटिंग (मलेशिया) वि.वि. निकोलस राज/ तुषार सुवीर 21-14, 21-19

मुली एकेरी

सरुनरक विटिडसर्न (थायलंड) वि.वि. अनुपमा उपाध्याय 21-17, 21-16

उन्नती हुडा वि.वि. तारा शाह 21-9, 21-17

मुली दुहेरी

वेण्णाला कलागोटला/ श्रीयांशी वालिशेट्टी वि.वि. नवीन कंदेरी/ रक्षिता श्री संतोष रामराज २२-२०, २१-१२

मिश्र दुहेरी,

प्रेम कुमार प्रभू राज मोहन/ कनिष्क गणेशन वि.वि. सात्विक रेड्डी कनापुरम/ वैष्णवी खडकेकर 21-15, 21-12

दिव्यम अरोरा/रिद्धी कौर तूर वि.वि. समरवीर/राधिका शर्मा 22-20, 24-22;