लावण्यवती कविता ही कवी मनाची अप्रतिम निर्मितीच – कवी शंकर अथरे

0

औंध :

काव्य मैफिल ही प्रतिभावंत कवींचा महोत्सव असतो. सजलेल्या, नटलेल्या शब्द प्रतिमांच्या माध्यमातून मुक्तपणे संचारणारी, आंतरमानातील हुंकार होऊन प्रकटणारी कवी मनाची अप्रतिम निर्मिती ही लावण्यवती कविता असते, असे प्रतिपादन जेष्ठ कवी आणि कादंबरीकार शंकर अथरे यांनी केले.

येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील वाङमय मंडळ व स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नभ उतरू आलं’ कविता पावसाच्या या काव्यमैफील प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण आंधळे होते. यावेळी भोसरीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रदीप कदम, माजी प्रा. आणि प्रसिद्ध गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर, स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ. स्नेहल तावरे, उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे उपस्थित होते.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. आंधळे यांनी सर्व मान्यवर कवींचे स्वागत करीत काव्यमैफिलीस शुभेच्छा दिल्या. डॉ. तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. या काव्य मैफिलीमध्ये पावसाचे विविधांगी रूपातून कवीला व्यक्त होता आले. तेजस्विनी पाटील, मधुश्री ओव्हाळ, श्रीपाद खैरनार, मंजिरी एंडाईत, अपर्णा पांडे, दीपक करंदीकर, डॉ. ज्योती राहळकर, बाळासाहेब दिघे, मीनल कुलकर्णी, डॉ. शोभा शिरढोणकर, वैशाली भालेराव, डॉ. मृणालिनी पवार, आदी या मान्यवर कवींनी सहभाग घेतला होता. प्रा. डॉ. सविता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर वाङमय मंडळाच्या कार्याध्यक्ष प्रा. अनंत सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. प्रा. डॉ. रेश्मा दिवेकर, प्रा. चंद्रकांत बोरुडे, प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले दोन तास चाललेल्या काव्यमैफिलीची सूत्रसंवादांची भूमिका कवी दीपक कोडावळे यांनी पार पाडली.

See also  औंध येथे २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त होणार 'विशेष योग शिबिर'