भारताचा इंग्लंडवर पहिल्या वनडे सामन्यात एकतर्फी विजय

0

इंग्लंड :

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात मंगळवारी (१२ जुलै) केनिंग्टन ओव्हल येथे खेळला गेलेला पहिला वनडे सामना पाहुण्यांनी एकतर्फी जिंकला. पाहुण्या भारतीय संघाने या सामन्यात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले.

आधी गोलंदाजी नंतर फलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत इंग्लंडवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ २५.२ षटकात ११० विकेट्सवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या ११४ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर १८.४ षटकातच सामना जिंकला.

रोहित आणि धवनची विजयी भागीदारी
इंग्लंडच्या नाममात्र १११ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने जबरदस्त भागीदारी रचली. कर्णधार रोहितने ५८ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या. तसेच धवनने ५४ चेंडूत ३१ धावांची उपयुक्त खेळी केली.

बुमराह-शमी जोडीची भेदक गोलंदाजी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करत असलेल्या इंग्लंड संघाची भारताच्या गोलंदाजांनी पुरती दैना केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच इंग्लंडवर दबाव बनवायला सुरुवात केली. पावरप्लेमध्ये काही महत्त्वपूर्ण विकेट्स काढल्यानंतर इंग्लंडवरील दबाव आणखीनच वाढला आणि त्यांची फलंदाजी फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर सर्वाधिक ३० धावा करू शकला. तसेच डेविड विलीने २१ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडचे ४ फलंदाज तर शून्य धावेवर बाद झाले.

या डावात बुमराहने सर्वाधिक ६ विकेट्स घेत वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन केले. ७.२ षटकात १९ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. तसेच शमीनेही त्याला चांगली साथ दिली. त्याने ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याच्या वनडेतील १५० विकेट्सही पूर्ण झाल्या. प्रसिद्ध कृष्णाने उरलेली एक विकेट घेतली.
https://twitter.com/BCCI/status/1546887319055380481?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1546887319055380481%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  भारताची स्टार तिंरदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषक २०२१ मध्ये मिळवले तिन सुवर्ण