एकनाथ शिंदे यांची गाडी बुलेट ट्रेन पेक्षा वेगाने धावेल : नितीन गडकरी

0

मुंबईः

एकनाथ शिंदे यांना आम्ही अमृत पाजलयं. त्यामुळे त्यांची गाडी बुलेटनपेक्षा वेगाने धावेल. स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्त ‘संकल्प से सिध्दी‘ या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी पुढचे 25 वर्ष आपल्याला काय करायचे, त्याचा एक प्रकारे आढावा घेतला. शपथविधी नंतर आम्ही लगेच काम सुरु केले. केंद्र सरकार आमच्या सरकारला मदत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशिर्वाद आहे. अमित शाहांची साथ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आता नितीन गडकरी आपल्याला जास्त मदत करणार आहेत. यापूर्वी नितीन गडकरींनी केलेल्या महामार्गांचा आणि उड्डाण पूलांच्या कामांचा उल्लेख केला.

मी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात उद्योजकांना भेटत असून येणाऱ्या काळात कौशल्य विकास, कृषी या क्षेत्रास महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी या उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहनही शिंदे यांनी योवळी केले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे.

देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते‍ विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल किंवा या महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल असोत यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण होणार आहे. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे.

See also  कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी अडचणीत...