शिवम सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त “नवजात बालक किट अमर्यादित योजना” तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.

0

पाषाण :

माजी स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त “नवजात बालक किट अमर्यादित योजना” तसेच प्रभाग क्रमांक 14 मधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व वह्या वाटपाचा कार्यक्रम पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नवजात बालक किट मध्ये हिमालय बेबी किट, नेटची गादी, बाळासाठी तिन जोड कपडे आणि आई साठी साडी असे चांगल्या प्रतीच्या वस्तू किटमध्ये उपलब्ध करून देत आहे.

यावेळी प्रास्ताविक करताना माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार म्हणाले की, आपल्या परिसरामध्ये असंख्य गोरगरीब महिला आहेत की यांना आपल्या नवजात बालकांसाठी कीट घेता येत नाही. म्हणूनच या महिलांसाठी नवजात बालक किट उपलब्ध करून देत आहे. तसेच आपल्या परिसरामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन करून आपल्या परिसराचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शैक्षणिक क्षेत्रासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भविष्यात केवळ शुभेच्छा न देता साथ देण्याच्या आश्वासन देत आहे.

यावेळी बोलताना पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, शिवम सुतार यांनी आपला वाढदिवस एका चांगल्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचे ठरविले हे फार कौतुकास्पद आहे. वाढदिवसानिमित्त गोरगरीब महिलांसाठी ‘नवजात बालक किट’ योजना सुरू करून आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रमातून साजरा करत आहे. भविष्यात देखील असेच सेवाभावी उपक्रम राबवत परिसरातील समाजाची सेवा शिवम करत राहील अशी अपेक्षा आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून भविष्यासाठी चांगले तरुण घडावेत यासाठी प्रयत्न करत आहे. अतिशय कमी वयामध्ये स्वतःचे समाजाविषयी असणारे प्रेम जपण्याचे काम सामाजिक बांधिलकीतून वेगवेगळे उपक्रम राबवत शिवम सुतार करत आहे. अशा तरुण होतकरू नेतृत्वाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा सर्वांच्याच वतीने देत आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार, दत्तात्रय कोकाटे, अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, ज्ञानेश्र्वर भेगड़े, सचिन दळवी, वैभव मुरकुटे, लहू बालवडकर, सौरभ कोकाटे, रोहन कोकाटे, संतोष धनकुडे, संदीप कोकाटे, अक्षय पिसाळ आणि मित्रपरिवार विद्यार्थी आणि महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता.

See also  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा : माजी नगरसेवक सनी निम्हण यांचे आवाहन