माॅडर्न महाविद्यालयाच्या वतीने मुला मुलींना छञ्यांचे वाटप.

0

शिवाजीनगर :

असा अभिनव उपक्रम राबविणारी भारतातील ही पहिली संस्था आहे. विद्यार्थी शाळेत यावेत, आभ्यास करावा यासाठी हा कार्यक्रम राबविला आहे. हि कल्पना संस्थेच्या उपकार्यवाह डाॅ निवेदिता एकबोटे यांनी मांडली व संस्थेने ती आकारात आणली. पी ई सोसायटी अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असते. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमधे सोसायटीचा कायम सहभाग असतो.

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्था जे कार्य करते याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पावसा पासुन व पावसाळी आजारातून वाचविण्यासाठी आज १००० छञ्यांचे वाटप केले गेले. मुलांचे व मुलींचे माॅडर्न महाविद्यालय, पुणे यातील ५०० मुलींना व ५०० मुलांना छञ्यांचे वाटप केले आहे.

या प्रसंगी बोलताना कार्याध्यक्ष मा. डाॅ गजानन र एकबोटे म्हणाले,जसे भारताचे राष्ट्रपती डाॅ अब्दुल कलाम व पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी प्रतिकुल परिस्थितीतुन मार्ग काढत सर्वोच्च पद भुषविले याचे उदाहरण तुमच्या समोर आहे , परिस्थितीला न डगमगता त्यांनी शिक्षण घेतले, तसेच तुम्हीही घ्या . शिक्षणासाठी तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. गरीबीबर चिकाटीने, कष्टाने, प्रामाणिकपणाने मात करता येते. विद्यार्थ्यांनी शिक्षणात रस घेण्यासाठी त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा माया नाईक व मुख्याध्यापिका मा रोहिणी काळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मा सुषमा नांदगुडे व मा सुनिता पाटील यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा मुख्याध्यापिका अनिता बसाळे व मा सोनवणे यांनी केले.
हा कार्यक्रम पी ई सोसायटीने आयोजित केला होता. याचे समन्वय संस्थेचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मा नगरसेविका व संस्थेच्या उपकार्यवाह प्रा जोस्त्ना एकबोटे यांची होती. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

See also  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा वसाहत येथे 'शाहिरी जलसा' कार्यक्रम संपन्न.