सनी निम्हण यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुपी शुभेच्छा.

0

कोथरूड :

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी घालून दिलेल्या आदर्शास अनुसरून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने प्रभाग क्र. १२ औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील ६ वी ते १० वी तील गरजू ३००० विद्यार्थ्यांना मोफत बॅग व शालेय साहित्य वाटप तसेच ६००० घरेलू महिला कामगारांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बॅग आणि शालेय साहित्य व छत्री वाटपाचे अनावरण करण्यात आले. या साठी विशेष सेवा सप्ताह अंतर्गत नाव नोंदणी केली जात आहे.

बॅग, छत्री आणि शालेय साहित्याचे अनावरण करताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, सनी निम्हण यांनी अतीशय चांगला उपक्रम राबवित मला वाढदिवसाच्या सेवारुपी उपक्रम राबवून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे मला समाधान असून येणाऱ्या पुढील काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत असेच सेवारुपी कार्यक्रम राबवावे.

या विशेष सेवा सप्ताहची माहिती देताना माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले की, साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील, यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशी मी मनोमन प्रार्थना आहे. त्यांच्या प्रत्येक कामात, निर्णयात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असतो म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 12 औंध, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांना बॅग आणि शालेय साहित्य व घरेलू कामगार महिलांसाठी पावसाळी छत्री वाटप करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सेवा सप्ताह आयोजन केले असून 10 ते 17 जून या कालावधीत आपले नाव नोंदवावे. जेणेकरून आम्हाला या वस्तू आपल्या घरापर्यंत पोहोचवायला मदत होईल.

नोंदणी स्थळ:
शारदाताई पुलावळे (सरचिटणीस शिवाजीनगर, भाजपा महिला आघाडी),
शारदा एंटरप्रायजेस,
कस्तुरबा वसाहत, औध.

शॉप नं. 1
प्रथमेश अपार्टमेंट,
भैरवनाथ मंदिरासमोर, औंध गांव.

वनमालाताई कांबळे
वाल्मिकी मंदिरा शेजारी,
इंदिरा वसाहत, औध,

See also  भाजपा आमदार, नगरसेवकांना मध्ये समन्वयाच्या अभावामुळे लोकहिताची कामे रखडतात : दत्तात्रय बहिरट

नोंदणी कालावधी
10 जून ते 17 जून 2022