पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाह पदी रवींद्र आंदेकर, तर सहकार्यवाह पदी दत्तात्रय कळमकर यांची एकमताने निवड.

0

पुणे :

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाहपदी रवींद्र उर्फ राजेंद्र आंदेकर, तर सहकार्यवाहपदी दत्तात्रय कळमकर यांची संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचनेनुसार एकमताने निवड करण्यात आली. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्याकार्यकारिणीची सभा संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.

एक खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पंच प्रमुख, कुशल नेतृत्व म्हणुन प्रखर निर्णय क्षमता असणारे मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणारे शिवाई कबड्डी संघाचे प्रशिक्षक कबड्डी वर अतोनात प्रेम करणारे रविंद्र उर्फ राजेंद्र आंदेकर आणि एक खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक म्हणून सर्वांच्यात मिसळून काम करणारे बाणेर येथील सतेज संघाचे माजी खेळाडू कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे वरीष्ठ अधिकारी म्हणून शिस्त प्रिय व कणखर भुमिका निभावणारे दत्तात्रय कळमकर या दोघांच्या निवडीने पुणे जिल्हा कबड्डीला शिस्त लागेल अशी अपेक्षा आहे. दोघांचा असणारा अनुभव पाहता त्यांच्या अनुभवाचा आणि शिस्त प्रिय स्वभावाचा कबड्डी साठी चांगलाच फायदा होणार आहे.

या सभेस संघटनेचे उपाध्यक्ष आमदार अतुल बेनके, वीरधवल जगदाळे, महादेव कोंढरे, शकुंतला खटावकर, कार्यकारिणी सदस्य संजोग वाघिरे, कार्याध्यक्ष वासंती बोर्डे, उपकार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख,खजिनदार योगिराज टकले, सहकार्यवाह रवींद्र आंदेकर, दत्ता झिंजुर्डे, शिल्पा भोसले, योगेश यादव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य व माजी सरकार्यवाह मधुकर नलावडे आणि सहकार्यवाह रवींद्र आंदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या जागेवर नियुक्ती करण्यासाठी कार्यकारिणीची सभा घेण्यात आली. या सभेत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या.

See also  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त डेक्कन पुणे येथे मराठा क्रांती मोर्चा तर्फे स्मारकास पुष्पहार अर्पण.