स्पर्धा परीक्षेला असणारे महत्त्व लक्षात घेऊन यशश्री स्पर्धा परीक्षा अभियान लहू बालवडकर यांच्या संकल्पनेने सुरू.

0

बालेवाडी :

लहू बालवडकर सोशल वेल्फेअर व राष्ट्रबांधव अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होणाऱ्या ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियानाच्या बोध चिन्हांचे अनावरण भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट सिरीज 365 दिवस मोफत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या अभियानाची माहिती देताना युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, माझे उद्दिष्ट असे आहे कि, स्पर्धा परिक्षा म्हणजे काय हेच सर्वसामान्य लोकांना माहीती नसते. हि पुर्ण माहीती देऊन, या मधे सर्वसामान्य वर्गातील कुटुंबातील मुला मुलींनी सहभाग घ्यावा शासकीय नोकरीत याची निवड व्हावी, युवकांना भावी जीवनामध्ये कर्तृत्व सिद्ध करता यावे, यासाठी त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. म्हणून आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेला असणारे महत्त्व लक्षात घेऊन ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियान सुरू करत आहे. परिसरातील मुले मुलींनी सक्षम आणि कणखर व्हावे, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष होईल, त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याने वैयक्तिक जीवनात प्रगती करावी, यासाठी मी असे आव्हान करेल की, सर्वच पालकांनी आपल्या मुला-मुलींना या अभियानात सहभागी करावे. यातुन भविष्यात नक्कीच चांगला अनुभव किंवा निकाल आपल्या मुलाचा किंवा मुलीचा आपल्याला पाहिला मिळेल. स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने मोफत देणार आहे. सुस, महाळूंगे, बाणेर, बालेवाडी, औंध भागातील जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आव्हान करत आहे.

लहू बालवडकर है आपल्या सामाजिक जीवनामध्ये नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून सेवा हेच संघटन याचे पालन करत आहे. त्यांनी राबवलेले अभियान युवकांना लाभदायी ठरेल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

युवकांच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या स्पर्धा परीक्षा साठी हे अभियान राबवून लहू बालवडकर एक चांगलं काम करत आहेत असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

See also  बाणेर येथे राजेंद्र धनकुडे यांच्या वतीने शेतकरी आठवडे बाजारास सुरुवात.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री माननीय सि. टी. रवी यांच्याकडून ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियानाचे कौतुक करण्यात आले. त्यांनी लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार गिरीश बापट आणि प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.