छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त डेक्कन पुणे येथे मराठा क्रांती मोर्चा तर्फे स्मारकास पुष्पहार अर्पण.

0
slider_4552

पुणे :

मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त डेक्कन पुणे येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करप्यात आला यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, युवराज दिसले, जितेंद्र कोंढरे, दत्तात्रय गायकवाड, किशोर मोरे, विशाल गुंड, संगीताताई भालेराव, विशाखा भालेराव, राजाभाऊ आटोळे, सचिन सावंत, आकाश भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळली. अजोड पराक्रम आणि असामान्य शौर्याची रणांगणात प्रचिती देतानाच समाजकारण, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रांमध्येही संभाजी महाराजांनी वर्चस्व गाजवले. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे.

मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले व यंदाच्या कोरोना महामारीला हरवुन पुढील वर्षी मोठया प्रमाणात जयंती साजरी करूया, व मराठा आरक्षण लढयाला आम्हांला यश मिळवाव अशी शपथ घेण्यात आली…

See also  संभाजी पुलावरून क्रॉस होणार्‍या मेट्रो ट्रॅकचा फोल्डींग मेट्रो पुल किंवा पुलाची उंची वाढवण्याचा आग्रह सोडून द्यावा लागणार : मुरलीधर मोहोळ