मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री होत रहावा हे स्वप्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई :

“मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होणार असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो.

आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिन, हे ही माझं स्वप्न आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सव समारंभास उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मन की बात’ ऐकवली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपद कसं मिळालं?, त्यांच्या महत्त्वकांक्षा होती का? मुख्यमंत्रिपदाविषयी त्यांची भविष्यातली इच्छा काय आहे? अशा मुद्द्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

https://twitter.com/ShivSena/status/1522581848068603907?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522581848068603907%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, “मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, मी मुख्यमंत्री बनेन असं माझ्या स्वप्नातही आलं नाही. पण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाळे आणि माझ्यावर राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. मी मुख्यमंत्री होईल, असं जरी मला वाटलं नव्हतं तरी मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाचं असेल हे माझं स्वप्न होतं. तसेच मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिलं, हे ही माझं स्वप्न आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

See also  जोपर्यंत कुणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत नसेल तर काठीचा उपयोग करु नका : पोलिस महासंचालक