जोपर्यंत कुणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत नसेल तर काठीचा उपयोग करु नका : पोलिस महासंचालक

0

मुंबई :

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संचारबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरातील करोना प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी सुधारित आदेश जारी केले आहेत.

राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होणार आहे. यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना सहकार्यासाठी आवाहन केले आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी यावेळी केले आहे.

जोपर्यंत कुणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत नसेल तर काठीचा उपयोग करु नका. अति उत्साहीपणा दाखवू नका. आम्हाला कारवाई करायची नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. पण कुठे तरी जाळपोळ, पब्लिक प्रॉपर्टी नासधूस होत असेल तर आम्ही काहीच करणार नाही असा याचा अर्थ नाही. असं काही चित्रं दिसलं नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा पडू नका, असंही ते म्हणाले आहेत.

See also  राजधानीमुळे मुंबई ते नाशिक प्रवास अडीच तासात होणार.