हरभजन सिंग देणार राज्यसभा खासदारकीचा सर्व पगार शेतकऱ्यांच्या मुली आणि सामाजिक कार्यासाठी.

0

पंजाब :

भारताचा माजी नामवंत फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांची नुकतीच आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली.

यानंतर आता हरभजन सिंगने मोठा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंग याने आपल्या खासदारकीचा पगार शेतकर्‍याच्या मुलीला देऊ केला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

हरभजन सिंग याने शनिवारी ट्विट करत घोषणा केली. ट्विटमध्ये भज्जी म्हणाला की, ‘एक राज्यसभा सदस्यच्या रुपाने माझा सर्व पगार शेतकऱ्यांच्या मुली आणि सामाजिक कार्यासाठी देणार आहे. देशाला आणखी उत्तम आणि कणखर करण्यात योगदान देऊ इश्चितो. त्यासाठी मी सर्वकाही करण्यास तयार आहे.’

हरभजन सिंग यांची पंजाबमधून राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा मूळचा जालंधरचा रहिवासी आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. भज्जीने डिसेंबर 2021 मध्ये 23 वर्षांची क्रिकेट कारकीर्द संपवली आहे. दोन वेळा विश्वविजेत्या भारतीय संघचा तो भाग देखील होता.

हरभजन सिंगने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करुण कारकिर्दीला सुरवात केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो अनिल कुंबळे, कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे. हरभजन सिंगने एकूण 417 विकेट घेतल्या आहे.

See also  मास्क चा वापर अजुन किती दिवस ? निती आयोगाचा नागरीकांना सल्ला