डॉ.आंबेडकर महाविद्यालयात मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर, क्रोमा व इम्पेरेटीव्हमध्ये ३४ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

0

औंध :

रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात, महिला विकास मंच, प्लेसमेंट सेल, महिंद्रा प्राइड क्लासरूम आणि कॉमर्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी एक आठवड्याचा ‘सॉफ्ट स्किल्स’ आणि नोकरीसाठीचे आवश्यक कौशल्य याच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २२/०३/२०२२ ते २५/०३/ २०२२ दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर महाविद्यालयात पार पडले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि प्रशिक्षक मा. सपना सूद यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.रमेश रणदिवेही याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयाचे ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल’ प्रमुख प्रा. कुशल पाखले सर यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय करून दिला, त्यानंतर महिला विकास मंचच्या समन्वयक प्रा. आसावरी शेवाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इंग्रजी विभागाच्या प्रा. सायली गोसावी यांनी मानले. याप्रसंगी इंग्रजी विभागप्रमुख डॉ.सविता पाटील, काॅमर्स विभाप्रमुख डाॅ.बंडोपंत कांबळे, महिंद्रा प्राइड क्लासरूमच्या सीमा भागवत, पंकज दांडगे, प्रा.मयुर माळी, प्रा.कल्पना कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी भविष्यात येणाऱ्या समस्यांना धीराने सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या नोकरीच्या संधीचा फायदा घेण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मुलींना सॉफ्ट स्किल, मुलाखत कौशल्य, आत्मविश्वासाचे महत्त्व, टाइम मॅनेजमेंट, प्रेझेंटेशन, सांघिक भावना, तणाव व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नांदी फाउंडेशन व महिंद्रा प्राइड क्लासरूम यांचे या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले. या प्रशिक्षण शिबिराचा महाविद्यालयातील एकूण ४० विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

३४ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
महाविद्यालयात क्रोमा व इम्पेरेटीव्ह या कंपन्यांकडून विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल ३४ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. दोन दिवस चाललेल्या या ‘प्लेसमेंट कॅम्प’मध्ये महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मुलाखती दिल्या. समाजातील शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठीच्या दर्जेदार शिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे नेहमीच अग्रेसर असतात. परंतु, दर्जेदार शिक्षणाबरोबरच आता विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी महाविद्यालयाकडून उपलब्ध करून दिल्या जात असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर, दोन दिवसीय ‘प्लेसमेंट कॅम्प’ साठी प्रा.कुशल पाखले, प्रा.मारुती कांबळे व प्रा. सायली गोसावी यांनी मेहनत घेतली.

See also  बाणेर पिंपळेनिलख पुलाच्या कोनशिलेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करण्याची आर पी आय ची मागणी.