बाणेर पिंपळेनिलख पुलाच्या कोनशिलेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करण्याची आर पी आय ची मागणी. 

0

औंध : प्रतिनिधी :-

बाणेर ते पिंपळेनिलख जोडणारया पुलाला भारतरत्न. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुल असे नामकरण पिंपरी चिंचवड महानगरपालीकेने प्रस्तावास दि. 7/5/2010 साली मान्यता देण्यात आलेली आहे. ह्या पुलाचे बांधकाम पिंपरी चिंचवड महानगरपालीकेने केलेले आहे, असे प्रस्ताव मान्य झालेल्या पत्रकामध्ये माहिती देण्यात आली आहे. हा पुल दोन्ही महानगरपालीकेच्या मुळा नदीच्या सिमेवरील असून पिंपरी चिंचवड महानगरपालीकेने दोन्ही हद्दीच्या बाजूला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे लोखंडी फलक बसविलेले आहेत.

परंतु पुणे महानगरपालीकेने प्रस्थापित राजकीय दबावाखाली पुलाच्या उदघाटनाच्या कोनशिलावर फक्त राजकीय मान्यवरांचीच नावे टाकून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उल्लेख केलेला नाही. तरी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर नेते रमेश ठोसर यांनी पुणे मनपा आयुक्त यांच्याकडे दोन वेळा पत्राद्वारे पुलाच्या उदघाटन कोनशिलेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उल्लेख करण्याची दोन महिने सतत मागणी करून देखील पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दखल घेतली नाही.

म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना रमेश ठोसर यांच्या नेतृत्वाखाली पुलाच्या उदघाटनाच्या कोनशिलेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उल्लेख करण्याची मागणी करण्यात आली. महापौर यांनी सबंधित पुणे महानगरपालीका अधिकारी यांना तातडीने आदेश देऊन कायदेशीर पध्दतीने पुलाच्या उदघाटन कोनशिलेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल असे सांगितले. यावेळी पुणे शहर भाजप पदाधिकारी राहुल कोकाटे, सचिनजी वाडेकर तसेच रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी तुकाराम गाडे, निलेश ठोसर, अजय निरवणे, अभय लोखंडे, इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पोलिस दलात दाखल झालेला प्रत्येक शिपाई पीएसआय म्हणून निवृत्त होईल, अशी योजना : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील