नागपूर :
देशात 10 वर्षांपूर्वी जे शक्य वाटत नव्हते ते इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. अॅल्युमिनियम धातूपासून तीन कोचेस असलेली महामेट्रो तयार करण्यात आली आहे. या उपलब्धीमुळे, महामेट्रोमुळे नवीन इकोसिस्टम निर्माण होत असल्याचे महामेट्रोच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय नगर विकास मंत्रालय सचिव तथा महामेट्रोचे अध्यक्ष मनोज जोशी म्हणाले. ते कोलकत्ता येथे उद्घाटन कर्यक्रमाप्रसंगी बोलत होते. नागपूर मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही महामेट्रो खास पुणे प्रकल्पासाठी तयार करण्यात आली असून, ती उद्घाटनानंतर पुणेसाठी रवाना करण्यात आली आहे.
देशातील पहिली, अॅल्युमिनियम धातूपासून तयार केलेल्या कोचेसच्या महामेट्रोची निर्मिती कोलकत्ताच्या टीटागड कोचेस निर्मिती कारखान्यात करण्यात आली. महामेट्रोचा पुणे प्रकल्पासाठी हा नवीन प्रयोग महत्वाचा टप्पा ठरणार आहे. उद्घाटनाप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी जयदीप, महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर हे उपस्थित होते.
महामेट्रोने अनेक इतिहास रचले असून यात आणखी भर पडली आहे. १० वर्षांपूर्वी कोचेस बनवण्याचा साधा विचार करणे देखील शक्य नव्हते. ते आज वास्तविकतेत साकारले असल्याचे महामेट्रोचे अध्यक्ष मनोज जोशी म्हणालेत. या क्षेत्रात गुंतवणूक करणे ही देखील जोखमीचे होते. हे जोखीम स्वीकारल्याने टिटागड वॅगनचे कौतुक केले. या प्रकल्पामुळे `मेक इन इंडिया’ चे स्वप्न साकार होत असल्याचे देखील सचिव मनोज जोशी म्हणाले. एकीकडे ही अभिमानाची बाब असताना, दुसरीकडे याची गुणवत्ता आणि देखभाल हे सुद्धा मोठे आव्हान असणार असल्याचेही जोशी म्हणाले. महामेट्रोने अॅल्युमिनियम कोचला प्राधान्य दिल्याबद्दल महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीक्षित यांचे अभिनंदन केले.
वजनाने कमी असलेल्या मेट्रोच्या कोचचे निर्माण होणे आणि त्याचा मेट्रो प्रकल्पाकरिता वापर होणे ही संपूर्ण देशाकरीता अभिमानाची बाब असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले. या संपूर्ण कोचसचे डिजाईन देशात झाले आहे. २०१५ मध्ये नागपूर मेट्रोसाठी कोचेस निर्माण करणारी भारतात एकही कंपनी नव्हती. पण, आता देशात कोचेस निर्माण होत आहे. या नवनिर्मित अॅल्युमिनियम कोचेसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात वापरलेले अनेक सुटे भाग देशात निर्माण झाले आहेत.
देशात पहिल्यांदा निर्मित अॅल्युमिनियम कोचचे वैशिष्ट्य :
– सर्व साधारण कोचपेक्षा याचे वजन ६.५ टक्के कमी.
– पुणे मेट्रोकरिता ३४ मेट्रो ट्रेनचा ऑर्डर टिटागड वॅगन्सला दिला.
– प्रत्येक ट्रेनला ३ कोचेस असतील.
– पुणे मेट्रोला १०२ कोचेसची पुर्तता टिटागड वॅगन्स करणार.
– प्रति कोच प्रवासी आसन क्षमता ३२० असून ३ कोचच्या ट्रेनची प्रवासी क्षमता ९७० आहे.
– प्रत्येक कोचमध्ये ४४ व्यक्ती बसू शकतात.
– ट्रेनची गती ही ९० किलोमीटर प्रतीतास असणार आहे.
– यात प्रत्येक ट्रेनमधील 3 कोचपैकी एक कोच महिलांकरिता आरक्षित असणार.