निवृत्त पोलिस संघटना व एन्जॉय ग्रुपच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कुमार साळुंखे यांचा सत्कार..

0

औंध :

निवृत्त पोलिस संघटना व एन्जॉय ग्रुप यांच्या वतीने कुमार साळुंखे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभ माननीय भानुप्रताप बर्गे निवृत्त सहाय्यक पोलीस उपायुक्त क्राइम ब्रांच पुणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त क्राईम ब्रँच भानुप्रताप बर्गे यांचा सन्मान सुखाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा देत चांगले काम करणारे प्रमूख पाहुणे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचा सन्मान करण्याची सुवर्णसंधी मिळणे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी अभिमानाची बाब आहे. असे सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे यांनी मॅकन्यूजला माहिती देताना सांगितले. ही संधी दिल्याबद्दल त्यांनी निवृत्त पोलिस संघटना व एन्जॉय ग्रुपचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला विजय अम्रे, शिवाजी भिशे, दिलीप खरात, सावंत साहेब व इतर पोलीस अधिकारी उपस्थीत होते.

See also  औंध येथे महाविद्यालयाचे प्राचार्य यांची आत्महत्या !