महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या एचएससी परीक्षा पुढे ढकलल्या जाणार

0

पुणे :

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा पुढे ढकलल्या जाणार आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर घाटाजवळ बुधवारी सकाळी या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत.

आगामी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेचे ‘महत्त्वाचे आणि गोपनीय पेपर’ पुण्याला घेऊन जाणाऱ्या ट्रकला पुणे-नाशिक महामार्गावर बुधवारी पहाटे आग लागून मोठे नुकसान झाले होते .त्याचाच परिणाम आता परीक्षेच्या तारखेवर झाला आहे .

See also  औरंगाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण