एसकेपी कॅम्पस मध्ये रंगणार इंटर सोसायटी वुमन्स क्रिकेट लीग

0

बालेवाडी :

सोसायटीतील महिलांसाठी डॉ.सागर बालवडकर आणि प्रा. रुपाली बालवडकर यांच्या संकल्पनेतून इंटर सोसायटी वुमेन्स क्रिकेट लीग ही भव्य स्पर्धा एस के पी कॅम्पस बालेवाडी मध्ये आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तसेच पुरुषांच्या इंटर सोसायटी क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ राज्यसभा खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते २६/२/२०२१ रोजी सायं. ६:०० वाजता राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या उपस्थित होणार आहे.

पुरुषांच्या इंटर सोसायटी क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाची माहिती देताना डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चुरशीने झालेली स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून त्याचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पुरुष इंटर सोसायटी स्पर्धेच्या यशस्वी आयोजना नंतर महिलांची देखिल इंटर सोसायटी क्रिकेट लीगचे उद्घाटन होणार आहे.

महिलांच्या क्रिकेट लीग बद्दलची माहिती देताना प्रा. रुपाली बालवडकर यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्याबरोबर तेवढयाच ताकदीने कार्यरत असताना पहावयास मिळतात मग क्रिकेट त्याला अपवाद कसे काय असू शकेल! दैनंदिन व्यापातून थोडीशी सवड काढून महिलांना देखील क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेता यावा, त्यांच्यातील क्रिकेटची आवड जोपासता यावी यासाठी इंटर सोसायटी वुमेन्स क्रिकेट लीग ही भव्य स्पर्धा आयोजीत केली आहे. त्यानिमित्त महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी सर्व महिला खेळाडूंना टी – शर्ट्स वाटप करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण संघांनी सहभाग घेतला आहे. जवळपास २४० महिला खेळाडू प्रत्यक्ष मैदानावर खेळणार आहे. खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्येक खेळाडूला टी शर्ट दिला गेला आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी महिला खेळाडू उत्साहित आहेत. खेळण्याच्या दृष्टिने महिलां खेळाडूंनी देखील चांगली तयारी केली आहे.

See also  बालेवाडीत महिलादिनानिमित्त   'रणरागिणी' या क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन