बालेवाडी :
रॉयल रणभूमी आयोजित, यु.के.एम. कोथरूड एफ.सी., लहू बालवडकर सोशल वेलफेअर आणि ब्लेझ ऑलंपिया यांच्या सहयोगाने दिनांक ०७ मार्च रोजी महिलादिनानिमित्ताने ‘रणरागिणी’ या क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमांमध्ये बॉलिवूड बिट डान्स, योगासत्र, विविध खेळ तसेच प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रनरागिणी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मिसेस ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन २०१७ आणि यंग माइंड्स – एज्युकेशनल सोल्युशनच्या संचालिका डॉ.नमिता कोहोक उपस्थित होत्या. डॉ. कोहोक यांनी या कार्यक्रमात महिला आणि मुलींना संबोधून “महिलांनी स्वबळावर आपल्याला खुणावणाऱ्या क्षेत्रात प्रगती केली पाहिजे” असे मत व्यक्त केले. या वेळी डॉ. नमिता कोहोक यांच्या हस्ते स्नेहा ढमाले, सिमरन शेरला, श्रीदेवी भंडारी, गौतमी कामठेकर आणि वैष्णवी पवार या उदयोन्मुख महिला खेळाडूंचा सन्मान करण्यात आला .
तसेच लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने डॉ. नमिता कोहोक, आकांक्षा मालवीय ,अपूर्वा शेवटेकर , सरगम मिश्रा आणि आंशिका सिंग या रणरागिणींचा विद्या लहु बालवडकर, सुवर्णा इखनकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
खेळामध्ये चांगली कामगिरी बजाविल्याबद्दल या कार्यक्रमादरम्यान कु. अंकिता संजय गायकवाड (वय ९) हिला खेळातली शिष्यवृत्तीही देण्यात आली.
महिलांनाही समाजात समान हक्क मिळावेत यासाठी झालेल्या संघर्षालाही या दिवशी सलाम करण्यात येतो.जगभरात या दिवसाच्या निमित्तानं बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र इतर सर्वच कार्यक्रमां प्रमाणे महिला दिनावरही कोरोनाचं सावट होते. म्हणूनच कार्यक्रमाआधी संपूर्ण परिसर सॅनेटाईज करण्यात आला होता. कोविड -१९ बाबतीतल्या शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना आणि नियम पळून रनरागिणी हा महिलाविशेष कार्यक्रम सुरळीत पार पडला.