२०२१ चा वर्ल्ड गेम्स ऍथलीट पुरस्कार मिळवत गोलरक्षक पीआर श्रीजेशने रचला इतिहास. भारतातील पहिलाच पुरुष हॉकीपटू..

0

न्यू दिल्ली :

भारतीय पुरुष हॉकी संघाची भिंत समजला जाणारा गोलरक्षक पीआर श्रीजेशने इतिहास रचला आहे. श्रीजेशला २०२१ चा वर्ल्ड गेम्स ऍथलीट पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारा तो भारतातील पहिलाच पुरुष हॉकीपटू ठरला आहे.

पीआर श्रीजेशने चाहत्यांच्या मतदानाच्या जोरावर इतर २३ खेळाडूंना पराभूत केले. पीआर श्रीजेश याला १ लाख २७ हजार ६४७ मते मिळाली. दुसरीकडे, स्पेनचा गिर्यारोहण स्टार अल्बर्ट लोपेझ दुसऱ्या क्रमांकावर आला, त्याला ६७,४२८ मते मिळाली.

पीआर श्रीजेश हा वर्ल्ड गेम्स ऍथलीट पुरस्कार मिळवणारा भारतातील दुसरा हॉकीपटू आहे. २०९ मध्ये हा पुरस्कार भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने जिंकला होता.

पीआर श्रीजेशने ४ दशकांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड गेम्स ऍथलीट पुरस्कार मिळाल्यानंतर श्रीजेश म्हणाला, ‘हा पुरस्कार मिळाल्याने मला सन्मानित झाल्याचे वाटत आहे. सर्वप्रथम एफआयएचचे आभार ज्यांनी मला या पुरस्कारासाठी नामांकित केले. जगभरातील हॉकी चाहत्यांचे आभार. हा पुरस्कार त्यांना जातो.’

श्रीजेश म्हणाला, ‘मी असा खेळाडू आहे जो वैयक्तिक पुरस्कारांवर विश्वास ठेवत नाही, विशेषत: जेव्हा तुम्ही सांघिक खेळाचे खेळाडू असता. संघाच्या यशात केवळ ३३ खेळाडूंचाच नाही तर आणखी अनेकांचा हातखंडा आहे. हॉकी इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे खूप खूप आभार.”

https://twitter.com/FIH_Hockey/status/1488143750677377033?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1488143750677377033%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  ऑलिम्पिक इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमध्ये