MPL चेअरमनपदी मिलिंद नार्वेकर !

0

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचीव मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंत यांची MPL च्या गव्हर्निग काउन्सिलच्या चेअरमपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत ही बिनविरोध निवड करण्यात आली.

वानखेडे स्टेडियमवर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु आहे. या सभेला एमसीएचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित आहे. तसेच या बैठकीला शरद पवारांसह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित आहेत. मिलिंद नार्वेकर यांची एमपीएलच्या चेअरमनपदी निवड होणं अपेक्षित मानलं जात होतं. नार्वेकरांची निवड झाल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकरांचा एमसीएच्या कार्यक्षेत्रात थेट प्रवेश झाला आहे.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषविलं आहे.

See also  भारताचा ओव्हलवर पन्नास वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय