दक्षिण आफ्रिकेतील तीन वनडे सामन्यांसाठी केएल राहुल कर्णधार

0

मुंबई :

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 19 ते 23 जानेवारी दरम्यान ही एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. वनडे कॅप्टन रोहित शर्मा अजून दुखापतीमधून सावरलेला नाही.त्यामुळे त्याच्याजागी नेतृत्वाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील तीन वनडे सामन्यांसाठी केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बुमराह उपकर्णधार

जसप्रीत बुमराहची संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला विश्रांती देण्यात आली आहे. अक्सर पटेल आणि रविंद्र जाडेजा अनफिट आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. टी-20 चे कर्णधारपद सोडणाऱ्या विराट कोहलीला वनडेच्या कॅप्टनपदावरुन हटवण्यात आलं. कारण निवड समितीला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे.

रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत

विराटच्या जागी रोहितची कर्णधारपदी निवड करण्यात आली. पण रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेलाही मुकणार आहे. बंगळुरुत एनसीएमध्ये रोहित फिटनेसवर मेहतन घेण्यासाठी गेला होता. पण अजूनही तो फिट झालेला नाही.

ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यरला संधी

केएल राहुलने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची जोरदार सुरुवात केली आहे. सध्या तो कसोटीचा संघाचा उपकर्णधार आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू वेंकटेश अय्यर यांना वनडे टीममध्ये संधी देण्यात आली आहे. नुकत्यात संपलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत दोघांनी दमदार कामगिरी केली होती. गायकवाडने पाच सामन्यात 150.75 च्या सरासरीने 603 धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता. कोहली, पंत आणि बुमराह नऊ महिन्यानंतर वनडे संघात परतले आहेत.

वनडेसाठी भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार,), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यझुवेंद्र चहल, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,

See also  ६८व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उत्तर प्रदेश चे कडवे आव्हान मोडीत काढून महाराष्ट्र सेमी फायनल मध्ये !

https://twitter.com/BCCI/status/1476932067703156744?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1476932067703156744%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F