मुंबई :
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील नागरीक उत्सुक आहेत. मात्र त्यातचं कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
‘थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिमंत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना संकटाचे भान राखून खबरदारी घेण्याचं आवाहनही केलं आहे. नववर्षाचे स्वागत करताना जगावर कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोचं आणि आपल्या वागण्यातून, बेफिकीरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी द्यावी, असंही मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्याला आव्हांना तोंड देऊन त्याच्या छाताडावर उभं राहून यशाला गवासणी घालायची आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. देशात सध्या पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.